शेतकर्‍यांना मिळेल ‘या’ योजनेचा ‘लाभ’, जनावराच्या मृत्यूनंतर सरकार देणार पैसे, असा करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : शेतकर्‍यांसाठी पशु आणि शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असते. शेतकरी कोणत्याही नैसर्गिक संकटातून पिक वाचवण्यासाठी विमा काढतो. परंतु, अनेकदा शेतकर्‍याचा आधार मानल्या जाणार्‍या पशुधनाच्या विम्याबात विचार केला जात नाही. आजार, नैसर्गिक दुर्घटना आदीमुळे जनावराचा मृत्यू झाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान होते. जनावराच्या मृत्यूमुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई मिळण्याठी सरकारची पशुधन विमा योजना आहे. ही केंद्राची योजना असून देशातील निवडक 100 जिल्ह्यात सुरूदेखील करण्यात आली आहे. ही योजना देशातील 300 निवडक जिल्ह्यात नियमित चालवली जाणार आहे.

प्रीमियमचा मोठा भाग केंद्र किंवा राज्य देते
दूध देणारी गाय, म्हैस यांच्या किंमतीबाबत बोलायचे तर सध्या चांगले दूध देणार्‍या म्हैशीची किंमत लाख रूपयांपेक्षाही जास्त असते. तर घोडा, उंट यांची किंमत लाखो रूपयांत असते. यासाठी पशुधनाचा विमा काढणे आवश्यक ठरते.

प्रत्येक राज्यात वेगळी योजना
राज्य सरकार जनावरांच्या विम्यासाठी वेगवेगळ्या योजना काढत असते. जनावरांच्या विम्याचा एक मोठा भाग केंद्र किंवा राज्य सरकार देते. प्रत्येक राज्यात जनावरांच्या विम्याचा प्रीमियम आणि संरक्षण रक्कम वेगवेगळी असते. जसे की, उत्तर प्रदेशात गाय किंवा म्हैशीच्या 50,000 रूपयांच्या विम्या संरक्षणासाठी प्रीमियम रक्कम जनावराच्या जातीच्या आधारावर 400 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत आहे.

असा काढला जातो जनावरांचा विमा

1 शेतकर्‍याला आपल्या जनावराचा विमा काढण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या पशु रूग्णालयात विम्यासाठी माहिती द्यावी लागेल.

2 जनावरांचे डॉक्टर आणि विमा कंपनीचा एजंट शेतकर्‍याच्या घरी जाऊन तेथे जनावराच्या आरोग्याची तपासणी करतात.

3 जनावर निरोगी असल्यास आरोग्य दाखला जारी केला जातो.

4 जनावराचा विमा करताना विमा कंपनीद्वारे जनावराच्या कानात टॅग लावला जातो.

5 शेतकर्‍याचा त्याच्या जनावरासोबत फोटो काढला जातो. यानंतर विमा पॉलीसी जारी केली जाते.

योजनेच्या अंतर्गत देशी, संकरीत दुधाळ गाई आणि म्हैशींचा विमा त्यांच्या सध्याच्या बाजार भावावर केला जातो. विम्याचा प्रीमियम 50 टक्केपर्यंत अनुदानित असतो. अनुदानाचा पूर्ण खर्च केंद्र सरकार करते. अनुदानाचा लाभ प्रत्येक लाभार्थींना 2 जनावरांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे तसेच एका जनावराचा विमा कमाल 3 वर्षांसाठी केला जातो.