Akola News : प्रवासादरम्यान प्रवाशाचा एसटीमध्ये मृत्यू

अकोट : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये एका प्रवाशाचा प्रवासादरम्याम मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.5) रोजी घडली. संजय रामकृष्ण येनकर (रा. हिवरखेड, ता. तेल्हारा) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची विनावाहक बस (एमएच 06 एस 8043) घेऊन चालक ओइंबे हे अकोट येथून अकोला येथे जात होते. या बसमध्ये अकोटहून अकोल्याकडे संजय रामकृष्ण येनकर हे प्रवास करत होते. बस अकोला बसस्थानकात पोहचली. त्यावेळी एक प्रवासी हालचाल करत नसल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी चालकाला याची माहिती दिली.

प्रवाशाला हालवण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रवाशाचा मृत्यू अकोट ते अकोला या प्रवासादरम्यान झाला. या प्रवाशाची ओळख परेड केली असता खिशातील आधार कार्डावरुन प्रवाशाचे नाव संजय येनकर असल्याचे समजले. संजय येनकर हे वैद्यकीय उपचारासाठी अकोट येथून अकोला येथे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.