औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्‍ध : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन –  आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू झालेली आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.

औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये पोट कलमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. राम यांनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून समय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल मो.क्र.७०२८४२५२५६,उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख मो.क्र. ९५९४६१२४४४ यांच्याकडे औद्योगीक क्षेत्रातील विविध कंपन्यांना शासनाने दिलेले निर्देश/ मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कंपनी सुरु ठेवण्यासाठी परवानग्या देणे, कंपन्यांमध्ये आवश्यक ते लागणारे मनुष्यबळ, तसेच त्यांचे वाहन यांचे पासेस देणे, कोरोना विषाणू विषयाच्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राशी निगडीत पत्रव्यवहार करणे ह्या जबाबदा-या देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी कळविले आहे.