मोबाईल चोरी प्रकरणी जुळ्या भावांसह एका महिलेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – चर्नीरोड रेल्वे स्थानकात मोबाइल चोराला पकडताना धावत्या लोकलमधून एक ५३ वर्षीय महिला खाली पडल्या होत्या. त्या शकिल शेख यांचा त्यात मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन जुळे भाऊ आणि एक महिला आहे.

दोन्ही आरोपी हे नालासोपारा येथील संतोष नगर झोपडपट्टीत राहणारे आहेत. शिवम कृष्णासिंह आणि सत्यम कृष्णा सिंह असं या आरोपींची नावं आहेत. शिवम हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे. त्याचे मोबाइल चोरतानाचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यावर रेल्वे पोलीसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर वांद्रे पोलिसांच्या हाती सत्यम कृष्णा सिंह लागला. तेव्हा त्याने तो चोर मी नाही माझा भाऊ आहे, असं सांगितलं.

सत्यामने पोलीसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सत्यमकडून सर्व माहिती काढू घेतली आणि सापळा रचत शिवमला बेड्या ठोकल्या. तेव्हा दोघांनाही पोलीसांनी दम दिल्यावर दोघांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. हे दोघे अल्पवयीन असल्यापासून चोऱ्या करत आहेत. त्यामुळे दोघांवर अनेक गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत.

यांच्या शिवम हा मुख्य गुन्हेगार असून त्याच्यावर १७ गुन्हे दाखल आहेत. तसंच शिवम हा ४ महिन्यांपूर्वीच चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आला आहे. तर सत्यमवर ४ गुन्हे दाखल आहेत, तोही ९ महिन्यांची शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

चोरीच्यावेळी दोघांना पकडल्यास दोघे पोलीसांना एकेमेकांचे नाव घेऊन पोलीसांना गुंगरा द्यायचे. मात्र या प्रकराणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी यावेळी सखोल चौकशी करून दोघांनाही अटक केली आहे. तसंच चोरलेला शकिल यांचा फोन विक्रीसाठी ज्या महिलेला दिला होता. तिला अटक करण्यात आली आहे.  


आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात