काय सांगता ! होय, विमानात पडायला लागला पाऊस, चक्क छत्री घेवुन बसले प्रवासी (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – विमानात पाऊस पडताना पाहिला आहे? वाचून विश्वास नाही बसणार पण असा एक प्रकार घडला आहे. विमानात अचानक पाणी गळू लागल्यामुळे चक्क सहप्रवासी छत्री घेऊन बसले होते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क विमानाच्या आत पाऊस पडताना दिसत आहे.

हा व्हिडीओ रशियाचा असून एका विमानात ही घटना घडली. हे विमान खोबरोव्स्कहून सोचीला जात होते . या व्हिडीओमध्ये काही प्रवासी छत्री घेऊन बसले आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत सहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 11 जुलै रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सने हे पावसाचे पाणी नसल्याचे सांगितले आहे. एअरलाइन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एसीमध्ये गळती झाली होती. त्यामुळे पाणी गळत होते. अशातच प्रवासी छत्री घेऊन बसले.