महाराष्ट्रातील विमानतळांवरून मुंबईत पोहचणार्‍या प्रवाशांना सूट, दाखवावा लागणार नाही RT-PCR चा रिपोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसची प्रकरणे लागोपाठ कमी होत आहेत. राज्यात सोमवारी केवळ 15 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत, जी 15 मार्चनंतरची सर्वात कमी आहेत. तसेच मृत्यूंचे प्रमाण सुद्धा कमी होऊ लागले आहे. अशावेळी राज्यातील लोकांना दिलासा देण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या इतर विमानतळावरून येणार्‍या स्थानिक प्रवाशांना शहरात उतरण्यासाठी कोरोना व्हायरसची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात सूट दिली आहे.

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक

प्रवाशांवर टाकू शकत नाही दबाव
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सोमवारी जारी एका आदेशात म्हटले की, मुंबई विमानतळाचे अधिकारी प्रवाशांवर आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी दबाव टाकू शकत नाहीत. नवे निर्देश तात्काळ प्रभावाने लागू केले आहेत.

‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या

महाराष्ट्रात वाढवले लॉकडाऊन
राज्यात 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे, मात्र पहिल्याच्या तुलनेत शिथिलता देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कोरोनाने सर्वात जास्त प्रभावी राज्य होते. येथे रोज 60 हजारपेक्षा जास्त नवीन केस येत होत्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिबंध लावले होते.

मुंबईत कोरोना रिकव्हरी रेट 94% वर पोहचला
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार, महाराष्ट्रात सोमवारी मागील 24 तासात कोरोनाची 15,077 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर एकुण संख्या वाढून 57,46,892 झाली आहे. या दरम्यान 184 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईत सुद्धा कोरोनाची केवळ 676 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. शहराचा रिकव्हरी रेट 94 टक्केवर पोहचला आहे.

READ ALSO THIS :

Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

मुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी