प्रवाशांनी हात हलवत स्टेशनवर पोहचावे…घरातून सामान आणणार रेल्वे

नवी दिल्ली : पॅलेस ऑन व्हील्सच्या नंतर आता बॅग्ज ऑन व्हील्सची सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळेल. प्रवाशांना आपले सामान वाहण्याची आवश्यक असणार नाही. स्टेशनवर उतरल्यानंतर हमाल शोधण्याची गरज भासणार नाही आणि घरातून स्टेशनवर जाताना सोबत सामान घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. कारण रेल्वे अ‍ॅप अधारित बॅग्ज ऑन व्हिल सेवा सुरू करणार आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी आपले सामान अगोदरच बुक करतील. खुप कमी शुल्कात प्रवाशांच्या सामानाची डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध करण्यात येईल. विशेषता वरिष्ठ नागरिक, दिव्यांगांना आणि एकट्याने प्रवास करत असलेल्या महिलांसाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. रेल्वेच्या प्रस्थानापूर्वी सामान योग्य ठिकाणी पोहचवले जाईल, ज्यामुळे सामान आणणे आणि ट्रेनच्या बाहेर काढण्यासाठी त्रास होणार नाही.

उत्तर रेल्वेने यासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. उत्तर आणि उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले की, महसूल वाढवण्यासाठी हे एक चांगले पाऊल आहे. भाडे व्यतिरिक्त महसूल मिळवण्याच्या योजनेसाठी अ‍ॅप आधारित बॅग्ज ऑन व्हील्स सेवेचा ठेवा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी अशाप्रकारची ही पहिली सेवा असणार आहे.

एनसीआरच्या स्टेशनांवर मिळेल सुविधा
रेल्वेच्या योजनेनुसार सुरूवातीला ही सेवा नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली छावनी, दिल्ली सराय रोहिल्ला, गाजियाबाद, गुडगांव रेल्वे स्टेशनांवरून ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. प्रवाशांसह रेल्वेलाही वार्षिक 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.

मोबाइलवर बुक होईल सामान
अँड्रॉइड आणि आय फोन वापरणारे प्रवाशी आपले सामान घरातून रेल्वे स्टेशनपर्यंत आणणे आणि रेल्वे स्टेशनपासून घरापर्यंत पोहचवण्यासाठी अर्ज करतील. प्रवाशांचे सामान सुरक्षित पद्धतीने घेऊन रेल्वे प्रवाशाच्या बुकिंगच्या माहितीनुसार त्याच्या कोचमध्ये आणि स्टेशनवरून घरापर्यंत पोहचवण्याचे काम ठेकेदार करेल.

You might also like