पतंजली आयुर्वेदने मागील आर्थिक वर्षात कमावले 425 कोटी रुपये, बाबा रामदेव यांनी सांगितली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पतंजली आयुर्वेदचा एकुण नफा 21.56 टक्के वाढून 424.72 कोटी रूपयांवर पोहचला आहे. बिझनेस इंटेलीजन्स प्लॅटफॉर्म टॉल्फरने ही माहिती दिली आहे. या अगोदरच्या वर्षी म्हणजे 2018-19 मध्ये कंपनीचे एकुण प्रॉफिट 349.37 कोटी रूपये होते. 31 मार्चला संपलेल्या तिमाहीत पतंजलीचा महसूल मागच्या वर्षीच्या तुलनेत 5.86 टक्के वाढून 9,022.71 कोटी रूपयांवर पोहचला. या दरम्यान, पतंजली आयुर्वेदचा एकुण खर्च 5.34 टक्के वाढून 8,521.44 कोटी रूपये झाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत टॅक्सच्या पूर्वीचा प्रॉफिट 25.12 टक्के वाढून 566.47 कोटी राहिला. एका वर्षापूर्वी हा आकडा 452.72 कोटी रूपये होता.

पतंजलीच्या कामगिरीवर बाबा रामदेव यांनी काय म्हटले ?
अन्य इन्कमच्या आधारे होणार्‍या कमाईत सुद्धा समारे तीन पट उडी मारत 18.89 कोटी रूपयांनी वाढून 65.19 कोटी रूपयांवर इन्कम पोहचले आहे. पतंजली आयुर्वेदच्या कामगिरीवर बोलताना स्वामी रामदेव यांनी पीटीआयला सांगितले की, मागचे आर्थिक वर्ष आमच्यासाठी आव्हानात्मक होते, ज्या दरम्यान आम्ही रूची सोयाचे संपादन केले होते. आर्थिक आव्हाने असतानाही आम्ही निरंतर काम केले.

पुढील वर्षी शानदार ग्रोथची अपेक्षा
कंपनीच्या आऊटलुकबाबत रामदेव म्हणाले की, पतंजलीच्या उत्पादनांवर लोकांचा विश्वास वाढला आहे. त्यांचा हा विश्वास शुद्ध आणि रास्त दरातील उत्पादने मिळाल्याने वाढत आहे, ज्याचा परिणाम कंपनीच्या वाढीत दिसून येईल. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात (2020-21) आमची ग्रोथ जास्त होईल. दिव्य फार्मसी सारख्या काही सेगमेंटमध्ये मोठी तेजी दिसून येईल.

बाबा रामदेव म्हणाले, लॉकडाऊनच्या दरम्यान सुद्धा काही दिवस सोडले तर आमच्या सर्व्हिसेस बंद राहिल्या नाहीत. अन्य कंपन्यांना स्थिती संभाळण्यासाठी दोन महिने लागले. आमच्याकउे स्व:ताचे ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्ट्रिब्यूशन लाइन आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासनूच प्रॉडक्शनचे काम सुरू केले होते.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये केले रूची सोयाचे संपादन
कंपनीचे बिस्किट, नूडल्स, डेअरी कारोबार, सोलर पॅनल, अपॅरल आणि ट्रान्सपोर्टेशन पतंजली आयुर्वेदच्या अंतर्गत येत नाही. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यातच कंपनीने दिवाळखोर झालेली