पतंजलीचे CEO आचार्य बालकृष्ण AIIMS हॉस्पिटलमध्ये भरती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पतंजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती तब्येत बिघडली असून त्यांना ऋषिकेशच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तथापि, यासंबंधी पतंजली योगपीठ व्यवस्थापनाणे काहीही बोलण्यास नकार दिला होता मात्र काही वेळापूर्वी रामदेव बाबांनी याबाबत ट्विटरवर खुलासा करत अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसारआचार्य बालकृष्ण यांना प्रथम हरिद्वार येथील पतंजली योगपीठ जवळील भुमानंद रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ऋषिकेशमधील एम्समध्ये जाण्यास सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांचे रक्तदाब, ईसीजी आणि इको इत्यादी अहवाल सामान्य आले आहेत.

रामदेवबाबांनी केला खुलासा :

सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात होते. मात्र, रामदेव बाबांचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी बालकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका आला नसून त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं म्हटलं आहे. सध्या, त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य आल्या आहेत, परंतु मेंदूशी संबंधित समस्येची शक्यता लक्षात घेऊन त्यांना त्वरित ऋषिकेशमधील एम्समध्ये आणले गेले. त्यानंतर काही वेळेपूर्वीच रामदेव बाबांनी देखील खुलासा केला त्यांनी म्हटले,’

आदरणीय बाळकृष्णजी यांच्या आरोग्याबद्दल ज्यांनी चिंता व्यक्त केली त्यांचे आभार, जन्माष्टमीला एक माणूस पेडा घेऊन आला तो खाल्ल्यानंतर काही तासांपासून बाळकृष्ण बेशुद्ध पडले होते, आता परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे, आपणा सर्वांच्या प्रार्थना व भगवान कृपेने आचार्य जी लवकरच बरे होतील’

आरोग्यविषयक वृत्त –