Baba Ramdev – Patanjali Food Share | बाबा रामदेव यांची कंपनी या तारखेला देणार डिविडंट, शेअरने दिला 39000 टक्के रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Baba Ramdev – Patanjali Food Share | बाबा रामदेव यांची एकमेव लिस्टेड कंपनी पतंजली फूड्स लिमिटेड येत्या आठवड्यात गुंतवणूकदारांना डिविडंट देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 5 रुपये डिविडंट जाहीर केला होता. रेकॉर्ड डेट 26 सप्टेंबर 2022 ठरवण्यात आली आहे. एक्स-डिव्हिडंटची तारीख 23 सप्टेंबर आहे. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे शेअर बाजार बंद असेल. (Baba Ramdev – Patanjali Food Share)

 

काही दिवसांपूर्वी पतंजली फूड्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलाने 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,415 रुपये आहे. मात्र, आता शेअरमध्येही नफा-वसुली होताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा स्टॉक बीएसईवर 1,338.45 रुपयांवर बंद झाला.

 

रामदेव बाबांच्या पतंजली फूड्सचा शेअर तीन वर्षांत बीएसईवर 3.54 रुपयांवरून 1393 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना 39,250 टक्के इतका जबरदस्त रिटर्न मिळाला आहे.

 

पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी म्हटले आहे
की, येत्या पाच ते सात वर्षांत समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
तर दुसरीकडे बाबा रामदेव यांच्या 4 कंपन्यांचे आयपीओदेखील येणार आहेत.
येत्या काही वर्षांमध्ये समूह 5 लाख लोकांना रोजगार देणार आहे.
पतंजली समुहाचा सध्याचा व्यवसाय 40 हजार कोटी रूपये आहे.

 

Web Title :- Baba Ramdev – Patanjali Food Share | baba ramdevs company patanjali will pay dividend to investors date fixed share gave 39000 percent return bse nse stock market

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)