नो टेंशन ! आता येणार ६ महिने खराब न होणार पतंजलीचं दूध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात या घडीला रिटेल मार्केटमध्ये सर्वात मोठा वाटा असलेली कंपनी हि पतंजली आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीने आता बाजारात नवे दुग्धजन्य पदार्थ लॉन्च केले आहेत. यात आता गायीच्या दुधासह लस्सी, ताक आणि दहीदेखील मिळणार आहे. याशिवाय पतंजलीचं सहा महिने टिकणारं दूधही बाजारात येणार आहे. योग गुरु रामदेव बाबा यांनी यासंदर्भात एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पतंजलीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे इतरांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे बाजारात त्याला मागणी देखील आहे. अमूल आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत दही आणि ताक लिटरमागे ५ रुपयांनी स्वस्त आहे. सध्या मुंबई, पुणे, अहमदाबाद, अहमदनगर, दिल्ली-एनसीआर, हरिद्वार आणि जयपूर भागातील बाजारपेठेत पतंजलीचं ४ रुपयांनी स्वस्त असणारं टोन्ड दूध उपलब्ध होऊ लागलं आहे. लवकरच ते संपूर्ण देशात उपलब्ध होईल, असेही यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले.

टोन्ड दूध हे सामान्य दुधापेक्षा वेगळे असून तुम्ही यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी टाकून वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही हे दूध बाहेर देखील घेऊन जाऊ शकता. हे दूध लवकर खराब होत नाही. याचा दर ६० रुपये प्रतिलिटर आहे.