आता व्हाॅट्सअॅप विरुध्द पतंजलि ‘किंभो’

नई दिल्ली :  वृत्तसंस्था

बाबा रामदेव यांचे आता स्वदेशी मेसेजिंग अॅप बाजारात आले आहे. ‘किंभो’ या नावाने स्वदेशी मेसेजिंग अॅप पंतजलिकडून लाँच करण्यात आले आहे. संपूर्ण स्वदेशी तंञज्ञानाचा वापर करुन व्हाॅटसअॅपला टक्कर देण्यासाठी हे स्वदेशी अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.

पतंजली आता कोणकोणत्या क्षेञात उडी घेणार आहे यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतांना दिसुन येत आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये या अॅप्लिकेशनबद्दल पतंजलीने माहिती दिली त्यामध्ये या अॅप द्वारे वैयक्तिक आणि ग्रुप चॅटींग करता येणार आहे. मेसेजबरोबरच फोटो, व्हिडियो, ऑडियो, जीआयएफ फाईल, स्टीकर्स, लोकेशन पाठवणे सहज शक्य होणार आहे. हे अॅप वापरण्यात काही अडचणी येत आहेत अशा तक्रारी काही युजर्सनी केल्या आहेत.

आता भारत बोलेल किंभो, भारत विचारेल किंभो असे पतंजलीच्या प्रवक्त्यांनी एका ट्विट द्वारे ‘किंभो’ या संस्कृत  शब्दाचा हिंदीतुन अर्थ सांगितला. याचा अर्थ इंग्रजीमधील हॅलो, हाऊ आर यु किंवा व्हॉटसअॅप यासारखाच आहे. पतंजलीने संपुर्ण भारतीय तंञज्ञानाचा वापर करुण हे अॅप बनविले आहे असे त्यांनी आपल्या ट्विट द्वारे म्हटले आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन आपण हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करु शकता असे कंपनीने सांगितले.