Patent Application | पेटंट अर्ज करणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थासाठी शुल्कात 80% कपातीची घोषणा

नवी दिल्ली : Patent Application | उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी पेटंटसाठी अर्ज (Patent Application) करणार्‍या सर्व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थां (for all recognized educational institutions) साठी शुल्कात 80 टक्के कपाती (80 per cent reduction in fees) ची घोषणा केली आहे. या संस्था देशात असोत किंवा परदेशात त्यांना या सवलतीचा लाभ मिळेल. गोयल यांनी मंगळवारी म्हटले की, पूर्वी 80 टक्के शुल्ककपात त्या सर्व मान्यताप्राप्त संस्थांना मिळत होती ज्या सरकारच्या मालकीच्या आहेत.

गोयल यांनी म्हटले, मला वाटते की, हे खुप अनुचित होते. अशावेळी नवोन्मेषण केवळ सरकारी संस्थांकडूनच येतो. भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) च्या बौद्धिक संपदेवरील एका वेबिनारला संबोधित करताना गोयल म्हणाले, आता 80 टक्केची शुल्क कपात सर्व मान्यता प्राप्त संस्थांना मिळेल. मग त्या सरकारी संस्था असोत की खासगी संस्था.

गोयल यांनी हे सुद्धा म्हटले की, सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शाळा आणि कॉलेजांना 80 टक्के शुल्क कपातीचा लाभ मिळेल. म्हणजे कोणत्याही संस्थेसाठी प्रकाशन किंवा नूतनीकरण शुल्क 4,24,500 रुपयांवरून कमी करून 85,000 रुपये होईल. मला वाटते की हे विद्यापीठांसाठी मोठे प्रोत्साहन असेल आणि मला आशा आहे की, नविन विद्यापीठ आणि शिक्षण संस्था यामध्ये भाग घेतील.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या विमाननगर परिसरातून 14 लाखाचा गुटखा जप्त, दोघांवर कारवाई

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Patent Application | announcement of 80 reduction in fee for all educational institutions applying for patent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update