Pathaan Box Office Collection | शाहरुख खानचा बॉक्स ऑफिसवर डंका; पठाण ठरला 500 कोटी कमावणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पठाण हा चित्रपट (Pathaan Box Office Collection) गेल्या काही दिवसापासून भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘पठाण ‘ हा चित्रपट आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम , आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. पठाण (Pathaan Box Office Collection) या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं खूपच वादग्रस्त ठरलं होत. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरतोय का काय? अशा चर्चा रंगल्या होत्या पण अशातच आता पठाण हा चित्रपट नवीन विक्रम रचताना दिसत आहे.

 

पठाण हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’नं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. पठाणनं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई करुन बॉक्स ऑफिसवर (Pathaan Box Office Collection) दमदार एन्ट्री केली होती. वीकेंडच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आठवडाभर देखील आपली जादू दाखवत आहे. त्यामुळे आता पठाणने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे. 500 कोटी कमावणारा पठाण हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या पठाण या चित्रपटाने 22 व्या दिवशी 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
दरम्यान, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पठाण चांगली कमाई करताना दिसतोय.
पठाण या चित्रपटाने जगभरात तब्बल 950 कोटींची कमाई केली आहे.
त्यामुळे आता 1000 कोटींचा टप्पा लवकरच पठाण पार करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.
पठाणच्या यशानंतर शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत.
शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

 

Web Title : – Pathaan Box Office Collection | pathaan box office collection crossed 500 crore in 22 days shahrukh khan deepika padukone

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rana Daggubati | ‘राणा नायडू’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांसमोर

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)