मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) नुकताच प्रदर्शित झालेला ‘पठाण’ (Pathaan) चित्रपट चांगलाच वादत सापडला आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला हिंदू संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. मात्र दुसरीकडे पठाण (Pathaan) चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना (Marathi Movies) स्क्रिन मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. आता या वादात मनसेनं (MNS) उडी घेतली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’मुळे (Pathaan) मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? असा सवाल करत अमेय खोपकर यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2023
दरम्यान, याच मुद्यावरुन मनसेने चित्रपटगृहांना देखील इशारा दिला आहे. पठाण चित्रपटाला विरोध नाही, परंतु त्यामुळे मराठी चित्रपटांच्या स्क्रीन अडवल्या जाऊ नयेत. मराठी चित्रपटांना देखील स्क्रिन मिळाव्यात असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Pathaan |mns criticized ncp leader jitendra awhad over the movie pathan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update