Pathaan-Shahrukh Khan Besharam Rang | ‘पठाण’चं ‘बेशरम रंग’ गाणं पुन्हा वादात; संगीत चोरल्याचा पाकिस्तानी गायकाचा आरोप

पोलीसनामा ऑनलाईन : Pathaan-Shahrukh Khan Besharam Rang | अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत. शाहरुख खान जवळजवळ 4 वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं आणि भगव्या बिकिनीमुळे वादात सापडलं. हे प्रकरण शांत होते ना होते हे गाणे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. सेन्सॉर बोर्डाने गाण्यात बदल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता गाण्याचे संगीत चोरल्याचा आरोप पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने केला आहे. यासंदर्भात त्याने एक व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे. (Pathaan-Shahrukh Khan Besharam Rang)

सज्जाद अलीच्या मते ‘बेशरम रंग’ हे त्याच्या ‘अब के हम बिछडे’ या अनेक वर्षे जुन्या गाण्यासारखं आहे. त्याने ‘पठाण’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे, चित्रपटाचे किंवा गाण्याचे नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आपण एका आगामी चित्रपटातील गाणं ऐकत असताना आपल्या जुन्या गाण्याची आठवण आल्याचं सांगितलं. तसेच त्याने ते गाणं व्हिडीओत गायलं देखील आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक युझर्सने कमेंट करत आपले मत व्यक्त केले आहे. (Pathaan-Shahrukh Khan Besharam Rang)

पाकिस्तानी इंडस्ट्रीमधून गाणी किंवा ट्यून चोरल्याचा आरोप बॉलिवूडवर होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
याअगोदरदेखील अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडवर आरोप केले आहेत.
गायक आणि राजकारणी अबरार-उल-हक यांनी करण जोहरच्या ‘जुगजुग जिओ’ या चित्रपटातील त्यांचं
आयकॉनिक गाणं ‘नच पंजाबन’ चोरल्याचा आरोप केला होता.
यासंदर्भात अबरार-उल-हक टी-सीरिजवर खटला देखील दाखल करणार आहे.

Web Title :-Pathaan-Shahrukh Khan Besharam Rang | pakistani singer sajjad ali says shahrukh khan besharam rang song from pathaan is stolen from his music