Pathan Box Office Collection | ‘पठाण’ चित्रपटाने मोडला ‘KGF 2’ चा रेकॉर्ड; तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

पोलीसनामा ऑनलाइन : Pathan Box Office Collection | सध्या सर्वत्र बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेक वाद-विवाद या चित्रपटांवर झाले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचे देखील दिसले. तर या चित्रपटाने आजवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. आता पठाण या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशीचे कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत.

25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 57 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई या चित्रपटाने केली होती. तर या दोन दिवसांची कमाई लक्षात घेता या चित्रपटाने 127.50 कोटींची कमाई केली आहे. तर आता तिसऱ्या दिवशी देखील पठाण या चित्रपटाची कमाई 34.50 कोटींची असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे. मात्र अद्याप तरी अंतिम आकडा समोर आलेला नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Pathan Box Office Collection) केवळ 3 दिवसात 162 कोटींची कमाई केली आहे.

जगभरात विचार केला तर या चित्रपटाने 280 ते 290 कोटींचा आकडा हा पार केला आहे.
हे आकडे येणाऱ्या विकेंडला वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘KGF 2’ चाही रेकॉर्ड मोडला आहे.
‘KGF 2’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून विक्रम केला होता.
तोच विक्रम पठाण चित्रपटाने मोडत बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये आघाडी घेतली आहे.
KGF 2 या चित्रपटाने तीन दिवसात 143.64 कोटी कमावले होते.
तर पठाण या चित्रपटाने तीन दिवसात 162 कोटींची कमाई केली आहे.

Web Title :- Pathan Box Office Collection | pathan box office collection day 3 pathan continues earn best breaks kgf 2 record

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी

Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन