Pathan Movie | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठाण’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, करण्यात आला ‘कॉपी पेस्ट’चा आरोप

पोलीसनामा ऑनलाईन टीम : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 57 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल ‘पठाण’ (Pathan Movie) या हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर जोरात धुमाकूळ घालत होता. शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी हे खूप मोठे सरप्राईज गिफ्ट होते. मात्र आता या टीझरवर आक्षेप घेण्यात येत आहे. पठाण सिनेमाच्या टीमवर कॉपी-पेस्टचा (Copy Paste) आरोप केला जात आहे.

1 मिनिट 25 सेकंदाच्या टीझरमध्ये अनेक जुन्या हॉलीवुड (Hollywood) आणि बॉलीवूडच्या (Bollywood) चित्रपटातील काही दृश्य चोरल्याचा आरोप पठाण सिनेमाच्या टीमवर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक फोटो व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर सिनेमा प्रेमींनी पठाण चित्रपटाचा टीझर आणि इतर चित्रपटातील जुने सीन यांचा कॉम्बिनेशन करून कशा पद्धतीने कॉपी-पेस्ट करण्यात आले हे दाखवत पठाण सिनेमा टीझरचा जणू काही पंचनामाच केला आहे.
एवढेच नाही तर सिनेमाप्रेमींनी चक्क पठाण सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Director Siddharth Anand)
आणि शाहरुख खान यांना “नवनिर्मिती करणे जमत नाही आणि कॉपी-पेस्ट करताना चोरी लपवता हि येत नाही का?”
असा सवाल उपस्थित केला आहे पठाण चित्रपटात जॉन अब्राहमची (John Abraham) ज्याप्रमाणे एन्ट्री दाखवली आहे,
ती एन्ट्री हुबेहूब ‘कॅप्टन अमेरिका द विंटर सोल्जर’ (‘Captain America The Winter Soldier’)
सिनेमात सॅबेस्टियन स्टॅनने (Sebastian Stan) केलेल्या एन्ट्रीसारखी असल्याचे आरोप सिनेमा प्रेमींनी केले आहे.
तर त्याचबरोबर पठाण सिनेमाच्या ट्रीजरमध्ये ‘वॉर’,’टायगर’ अशा काही सिनेमा मधील निवडक दृश्यही नकल केल्याचा आरोप सिनेमा प्रेमींनी केला आहे.

 

Web Title :- Pathan Movie | shah rukh khan pathaan teaser copied from saaho war tiger

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या