पाथरी न.प. गटनेते जुनेद खान दुरानी यांची परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन –   नाशिक येथे टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक साधारण बैठकीत, पाथरी नगरपरिषदेचे गट नेते जुनेद खान दुर्रानी यांची परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली.

या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सरचिटणीस श्रीमती मीनाक्षी जाधव (गिरी) यांनी दिले. टेनिस क्रिकेट शालेय खेळांमध्ये समाविष्ट असलेल्या खेळांपैकी एक आहे. गेल्या पाच वर्षात जुनैद खान दुर्रानी यांनी पाथरी येथे पाथरी प्रीमियर लीग नावाची प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित करून केवळ परभणी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात टेनिस क्रिकेटसाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण केले.

परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी जुनैद खान दुर्रानी यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटपटूंमध्ये एक नवीन उमेदीचे वातावरण निर्माण झाले. जुनैद खान दुरानी यांनी पाथरी प्रीमियर लिग च्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे बर्‍याच खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे.

परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जुनैद खान दुर्रानी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी , मा.जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते , माजी जिप सभापती दादासाहेब टेंगसे , माजी जि प सदस्य चक्रधर उगले , जन्मभूमीचे पदाधिकारी सदाशिव थोरात , टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव शेख मुजीब , उपाध्यक्ष शेख जावेद , शेख शाहिद बागबान , राज्य पंच शंकर धावारे , संदीप सुत्रावे , अरविंद जाधव , सय्यद मुस्तफा , आशिष शेरे , भागवत घुमरे , बंटी पाटील , विवेक धांडे , वहाब खान पठाण , आदींकडून या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.