पाथरीत ‘कोरोना’चा शिरकाव प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन –  देशभरासह जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारसहा चोवीस तास कोविड योद्धा कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. जिल्हा कोरोना मुक्तीकडे जात असल्याचे दिसून येत असताना मागील काही दिवसांपासून गंगाखेड, परभणी शहरासह ग्रामीण भागात नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात बाधितांचा मृत्यूदर कमी आहे दाखल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पाथरी शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे.

नगरपरिषदेकडून शहरातील नूर नगर भागात सॅनिटायझर फवारणी केली जात आहे. आतापर्यंत पाथरी शहरात कोरोना बाधित दुसरा रुग्ण सापडला आहे. कोरोनाबाधित रुग्ण महिला ही हैदराबाद येथून परतल्याची माहिती आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरच्या पाथरी शहरातील नुरनगर परिसरामध्ये खबरदारीची उपाययोजना म्हणून सॅनिटायझर फवारणी करण्यात केली जात आहे. यावेळी पाथरी नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे जवान निखिलेश वाडेकर, खुर्रम खान, शारेखा खान, बळीराम गवळी.