विना ऑपरेशन स्टोनचा उपचार, स्टोन तोडून बाहेर काढू शकतात ‘हे’ 8 घरगुती आयुर्वेदिक उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम : स्टोन म्हणजे मुतखडा ही सामान्य समस्या असून ती कुणालाही होऊ शकते. स्टोन शरीरातील अनेक अवयवांमध्ये होऊ शकतो. ज्यामध्ये मूत्राशयातील स्टोन, किडनी स्टोन, पित्ताचा स्टोन, मूत्रमार्गातील स्टोन इत्यादी प्रकार आहेत. ही एक गंभीर समस्या असते जिच्यावर ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे. यामध्ये खुप वेदना होतात.

ही आहेत कारणे
1. पाणी कमी पिणे
2. अनुवंशिक कारण
3. मूत्रमार्गात सतत संसर्ग होणे
4. मूत्रमार्गात अडथळा
5. व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियमच्या औषधांचे सेवन
6. थॉयराईडची समस्या

ही आहेत लक्षणे
1. असह्य वेदना होतात
2. पाठ आणि पोटात सतत वेदना होणे
3. उलटी किंवा मळमळ होणे
4. लघवीला जळजळ होणे
5. लघवीत रक्त येणे
6. लघवीत वारंवार संसर्ग होणे

हे आहेत उपाय
मुळा आणि गाजर चूर्ण

10 ग्रॅम मुळ्याचे बी, 10 ग्रॅम गाजराचे बी, 20 ग्रॅम गोखरू, 5 ग्रॅम जवाखार आणि 5 ग्रॅम हजरूल यहूद कुटुन वाटून घ्या आणि चूर्ण बनवा. याच्या 3-3 ग्रॅमच्या पुड्या बनवा. एक पुढी सकाळी, दुपारी आणि रात्री दूध किंवा पाण्यासोबत घ्या.

लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल
हा प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे. हे रोज सेवन केल्यास स्टोन तुटून निघून जाईल.

भेंडी
आहारात भेंडीचा समावेश करा. किडनी स्टोनसाठी हा एक उत्कृष्ट आयुर्वेदिक उपाय आहे.

तुळशीचा रस
तुळशी रसासोबत पाणी प्यावे, तुळस शरीरात द्रव पदार्थ, खनिज आणि युरिक अ‍ॅसिडचे संतुलन ठेवते.

नारळ पाणी
किडनी स्टोनसाठी नारळपाणी सेवन करावे. यामुळे स्टोन विरघळतो आणि नंतर लघवी वाटे बाहेर पडतो.

डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस यावर चांगला उपाय आहे. यातील पोटेशियम मिनरल्स क्रिस्टल जमू देत नाही. किडनीतील विषारी घटक बाहेर पडतात, लघवीतील आम्लाचा स्तर कमी होतो.

सिंहपर्णीचे मूळ
डॉक्टरांनुसार डँडेलियन रूट टी प्यायल्याने किडनी स्टोनमध्ये आराम मिळतो.

टरबूजचा रस
टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पोटेशियम लवण असते जे मूत्रातील अम्लीय स्तर नियंत्रित करते. एक चतुर्थांश चमचा धणा पावडरसह एक कप टरबूजचा रस प्यायल्याने लाभ होतो.