पाथरी : आ. सतीश चव्हाण यांनी केला विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी पाथरी येथील सहिचार सभेच्या निमित्ताने श्रीमती शांताबाई नखाते विद्यालयत मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी येथे भेट दिली. व्यासपीठावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय येथे झालेल्या सहविचार सभेला डॉक्टर, शिक्षक, वकील, संस्थाचालक उपस्थित होते.

सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मुंजा भाले पाटील यांची उपस्थिती होती. तर वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी चे सभापती अनिलराव नखाते, जि. प. माजी सभापती सुभाष कोल्हे, जि. प. माजी उपाध्यक्षा भावनाताई नखाते, जि. प. सदस्य कुंडलिकराव सोगे, जि. प .माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी जि. प. सदस्य चक्रधर उगले, सदाशिव थोरात, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ थोरे, प्रल्हाद (नाना) चिंचाणे, विजय घुमरे, पि. आर. शिंदे, हबीब अन्सारी, शब्‍बीर अंसारी, अमोल भाले, रामेश्वर आवरगंड, शंकर भागवत, वाल्मिकी शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य नखाते आदींची विचार मंचावर उपस्थित होती.

आमदार सतीश चव्हाण यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, नोकरी व व्यवसायात पदवीधरांना संधी उपलब्ध करुन देण्यास वचनबद्ध आहे. पाथरी येथे आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, युवकांना नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मराठवाडामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी शैक्षणिक, कृषी, आणि औद्योगिक क्षेत्रात अनुशेष भरण्यास कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. विनाअनुदानित शाळांना अनुदान, वेतन, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विश्वनाथ थोरे, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य भावना नखाते आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश रोकडे यांनी केले तर सूत्रसंचालन गोपाल आमले यांनी केले. यावेळी डॉक्टर वकील व पदवीधर मतदार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून ही सभा घेण्यात आली.

कर्तव्यदक्ष आमदारात सतीश भाऊंचा समावेश – भवनाताई नखाते 
सभागृहात प्रश्न सोडविण्याची उत्तम शैली असलेल्या कर्तव्यदक्ष आमदारांपैकी सतीश भाऊ हे एक आहेत. माजी जि .प. उपाध्यक्ष भवनाताई नखाते म्हणाल्या की, सतीश चव्हाण हे एकमेव आमदार आहेत जे ग्रामीण भागातील ग्रंथालयांना संगणक व पुस्तके पुरवतात. आपल्या कार्यकाळात आमदार, सतीश चव्हाण यांनी विद्यार्थी, संस्था व कर्मचारी सह इतरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असून त्यांच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत असे माजी जि.प. उपाध्यक्षा भावना नखाते म्हणाल्या.