पाथरी नगर परिषदेचा दंडात्मक कारवाईचा बडगा; ‘बॉम्बे कलेक्शन’ या कापड दुकानाला 50 हजार रुपयांचा दंड

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रतिबंधात्मक नियम मोडणार्‍या दुकानावर अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाया केल्या जात आहे. पाथरी येथील पंचायत समिती संकुलातील कापडाच्या दुकानावर बुधवार (19 ) तारखेला नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानावर ही कारवाई करण्यात आली. कोरोना महामारी नियंत्रणासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिक दुकाने बंद ठेवली आहे.

पाथरी पंचायत समिती संकुलातील हे कापड दुकान उघडण्यात आले होते. त्यामुळे नगर परिषदेने या दुकानावर दंडात्मक कारवाई केली. दुकानावर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दुकान सुरू असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच शहरात प्रसिद्ध असलेल्या बाबा टॉवर येथील एका मोबाईल शाॅपीवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नगर परिषदेच्या या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. पाथरी पोलिस व नगर परिषदेकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

वेळोवेळी करण्यात येणाऱ्या आवाहना कडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली जात आहे.
या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या आणि दुकान उघडणार्‍यांना नक्कीच चाप लागेल अशी भावना व्यक्त केली जात आहे.