पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक, उपनिरीक्षकासह 5 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ! स्टेशनचं प्रवेशद्वार सील

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पाथरी पोलिस ठाण्यात पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात प्रभारी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाचा समावेश आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पाथरी पोलीस ठाणे प्रवेशद्वाराला नगरपालिकेकडून सीलबंद करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना च्या प्रादूर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. अशा महामारी च्या काळात पोलीस प्रशासन अहोरात्र सज्ज आहे. महसूल यंत्रणा, पोलीस प्रशासन, नगरपरिषद विभाग वेळेप्रसंगी कार्यतत्पर आहे. कोरोना योद्धा म्हणून प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडत आहे. पाथरी पोलिस ठाण्यात पाच जणांना बाधा झाली आहे.

पाथरी पोलीस ठाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घोषित केले आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराला नगरपरिषदेच्या वतीने पत्राचे सील ठोकण्यात आले आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून खबरदारी घेणे गरजेचे आहे.