‘पती पत्नी और वो’ सिनेमा ‘वादात’ ! मॅरिटल रेप ‘जोक’ प्रकरणी अभिनेत्री भूमी पेडणेकरने मागितली माफी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या पती पत्नी और वो सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षक मात्र नाराज झाल्याचे दिसले. पती, पत्नी और वो या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन, चिंटू त्यागीच्या रोलमध्ये आहे. भूमीने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय भूमीचा बाला हा सिनेमादेखील रिलीजसाठी तयार झाला आहे. सध्या भूमी आपल्या दोन्ही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

ट्रेलरमध्ये चिंटू म्हणजेच कार्तिक आर्यन लग्नाबद्दल तक्रार करताना मित्रापाशी म्हणतो की, “बायकोकडे सेक्सची मागणी केली तर आपण भिकारी. बायकोला सेक्स करण्यास नकार दिला तर आपण अत्याचारी. जर काही जुगाड करत सेक्स मिळवला तर बलात्कारीदेखील आपणच.” हा डायलॉग प्रेक्षकांना काही आवडला नाही. ट्विटरवर लोकांनी आपल्या नाराजी व्यक्त केली. लोकांचं म्हणणं होतं की, मॅरिटल रेप हा काही गंमतीचा विषय नाही.

भूमी पेडणेकरने मागितली माफी
ट्रेलरमधील डायलॉगवर टीका झाल्यानंतर भूमी पेडणेकरने एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. भूमी म्हणाली, “जर कोणत्याही कारणावरून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागते. सिनेमातील कोणत्याच व्यक्तीचा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. सिनेमाीतील कोणताच व्यक्ती अशा विचाराला प्रोत्साहन देत नाही.”

कार्तिकाच मोनोलॉग सिनेमातून हटवणार
कार्तिक आर्यनचे मोनोलॉग ही त्याच्या सिनेमाची खासियत असते. अशी माहिती समोर आली आहे की, आता कार्तिक आर्यनचा मोनोलॉग सिनेमातून हटवला जाणार आहे. कारण त्यावरून खूप वाद होताना दिसत आहे. या सिनेमात कार्तिक आणि भूमी व्यतिरीक्त अनन्या पांडे आणि अपारशक्ती खुराना दिसणार आहे. मुदस्सर अजीज हे या सिनेमाचे डायरेक्टर आहेत.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !