निर्भया केस : तिहार जेलमध्ये विनयला ‘स्लो-पॉयझन’ दिलं जातंय, वकिलाने न्यायालयाला सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात दोषी असलेल्या विनयच्या वकिलांनी न्यायालयात विनयला स्लो पॉयझन देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये शनिवारी निर्भया केस बाबतची सुनावणी सुरु होती. यातील तीनही आरोपींची पोलीस प्रशासनाविरोधात आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकील ए पी सिंह यांनी याचिकेत म्हंटले की, तिहार जेल प्रशासनाने अजून दोषी पवन, अक्षय आणि विनय यांची कागदपत्रे तपासली नाहीत यामुळे क्यूरेटिव पिटीशन आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी उशीर लागत आहे.

निर्भया कांड: दोषी विनय के वकील ने कोर्ट से कहा- तिहाड़ में उसे दिया गया धीमा जहर

वकील ए.पी. सिंह म्हणाले, त्याच्या क्लायंटला स्लो पॉयझन देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले पण वैद्यकीय अहवाल देण्यात आला नाही. मात्र प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावत हे खोट असल्याचं सांगितलं आहे.

आरोपींच्या वकिलांनी केला आरोप
वकील ए.पी. सिंह म्हणाले होते की, बुधवारी ते आपल्या आशिलांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते. त्यांनी आरोप केला आहे की जेल क्रमांक तीनमध्ये बंद असून देखील खूप प्रयत्नानंतर त्याना भेटण्याची संधी मिळाली.

पोलिसांनी सादर केली विनयची पेंटिंग आणि डायरी
दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की दोषींच्या वकिलांनी उल्लेख केलेली सर्व कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत एवढेच नाही तर पोलिसांनी दोषी विनयची पेंटिंग आणि डायरी देखील न्यायालयात सादर केली आणि दोषी केवळ उशीर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

नवीन डेथ वॉरंट झाले आहे जारी
पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांच्या साठी नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलेले आहे त्यांना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. यातील मुकेशने केलेली दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. तर बाकी दोषींकडे अजून तो पर्याय शिल्लक आहे. मात्र अजून त्यांनी त्यासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे आता एक फेब्रुवारीला यातील चारही दोषींना फाशी होणार हे निश्चित झाले आहे.

डिसेंबर 2012 मध्ये, एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर रॉडने हल्ला केला गेला होता. विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले होते, तेव्हा तिचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. याबाबत सहा आरोपी होते त्यातील एक नाबालिक असल्यामुळे त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली तर एकाने जेलमध्येच आत्महत्या केली. तर बाकी चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –