रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत चौधरी (42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बोईसर येथील चिन्मय रुग्णालयात 15 सप्टेंबरला चंद्रकांत चौधरी यांना दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे बिल पाहिल्यावर त्यांना चक्कर आली त्यानंतर त्यांना पुन्हा याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. चौधरी यांनी वॉर्डच्या समोरील रूममधून खाली उडी मारली. त्यानंतर चौधरी यांना रुग्णालयामध्ये दाखल उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. चिन्मय रुग्णालयाला असलेल्या खिडकीला वरच्या मजल्यावरदेखील कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी नाही. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना पहाटेच्या वेळी सामान्य वॉर्डमध्ये चंद्रकांत चौधरी यांना हलविण्यात का आले, असे अनेक प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत. यातच रुग्णालयात प्रमाणापेक्षा अधिक बिल आकारले जात असल्याचा आरोपदेखील केला जात असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.