जिल्हा रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांची 1 रुपयात तहान भागणार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – सुरत नागपूर महामार्गावरील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती . त्यात उन्हाळा हळूहळू तापू लागल्याने समस्या अधिक बिकट होत होती . रुग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी मोठा ञास होत होता . जादा दर देत पाणी विकत घ्यावे लागत होते . या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले . मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जयहिंद संस्थेने पुढाकार घेत अद्यावत पाणपोईची निर्मिती केली . या पाणपोईचा लोकार्पण कार्यक्रम  अधिष्ठाता डॉक्टर मिनाक्षी गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी डॉ. मृदुला द्रविड, डॉ. अमिता रानडे, डॉ. संध्या चौधरी, डॉ. नितीन पवार, राहूल तारगे,  विजय पवार, राकेश पवार, नामदेव पाटील, रामदास गोयर, सुरज अहिरराव आदी उपस्थित होते.

   पाणपोईच्या महत्वाच्या बाबी
   *एक रुपयाचे नाणे दिले की एक जार भरुन पिण्याचे पाणी मिळणार.
   *24 तास सेवा देणार आहे.
   *जादा पैसे हि खर्च होणार नाही
   *प्लास्टिक बाटली फेकल्याने कचरा होतो , तो होणार नाही.
   *पञाच्या शेडच्या छता खाली नातेवाईकांना डबे खाण्यासाठी व विश्रांतीसाठी मुबलक जागा आहे.