टेंडर पॉम हॉस्पिटलमध्ये 5 जणांचा मृत्यू, ऑक्सीजन संपल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप

लखनऊ : वृत्त संस्था – राजधानी लखनऊच्या गोमतीनगर येथील पॉम हॉस्पिटलमध्ये पाच रूग्णांचा एकाचवेळी मृत्यू झाला. हे सर्व रूग्ण ऑक्सीजन सपोर्टवर होते. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ झाला. नातेवाईकाच्या मृत्यूने संतापलेल्या कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या बाहेर धरणे धरले.

गोमतीनगर शहीद रोडवरील टेंडर पॉम हॉस्पिटलमध्ये रात्री उशीरा ही घटना घडली. आरोप आहे की, ऑक्सीजनच्या टंचाईमुळे हा प्रकार घडला आहे. बघता-बघता रूग्णांनी जीव सोडला. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. इंदिरानगर येथे राहणार्‍या रेखा सिंह, पोस्ट कोविड शंकर गुप्ता यांच्यासह इतर रूग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईक निधी मिश्रा म्हणाल्या की, माझे मेहुणे शंकर गुप्ता अवध विहारमध्ये राहतात. त्यांना 14 तारखेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

28 एप्रिलच्या रात्री सुमारे आठ वाजता ऑक्सीजनची संकट निर्माण झाले. रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेने संतापलेल्या निधी मिश्रा यांनी सकाळी हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर धरणे धरले. पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना समजावून शांत केले. हॉस्पिटलमध्ये 300 बेड आहेत. यामध्ये कोरोना आणि दुसर्‍या आजाराने पीडितांना दाखल केले जाते. बहुतांश बेड भरलेले आहेत. रात्री उशीरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले. पाच रूग्णांचा श्वास थांबला.

हॉस्पिटल प्रशासन म्हणाले…
हॉस्पिटलमध्ये पाच रूग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला, परंतु यश आले नाही. ऑक्सीजनच्या टंचाईमुळे रूग्णांचा जीव गेलेला नाही. हे रूग्ण गंभीर होते. नातेवाईकांचा आरोप बिनबुडाचा आहे.
-टेंडर पॉलम हॉस्पिटल, गोमतीनगर