अभिमन्यु पवार यांच्या पाठपुराव्यातून २० रुग्णांना १७ लाखांचा सहायता निधी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – गरीब व गरजू रुग्णांवरील उपचार पैशा अभावी थांबू नयेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन मदत केली जाते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी पाठपुरावा करून मागच्या महिनाभरात अशा २० रुग्णांना १७ लाख ३० हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे या रुग्णांवार उपचार करणे शक्य झाले आहे.

घरातील व्यक्ती आजारी असेल तर काहीच सुचत नाही त्यातच पैसे नसतील तर खुप वाईट परिस्थीती निर्माण होते. म्हणून अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. गरीबांना ही मदत मिळावी यासाठी अभिमन्यु पवार यांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. या माध्यमातूनच हा निधी उपलब्ध झाला. या सहायतेमुळे २० जणांना जगण्याची नवसंजीवनी मिळणार आहे.

सहायता निधी लाभार्थींची नावे-

मागच्या महिनाभरात पुस येथील नंदिनी साळुंके यांना २ लाख रुपये, प्रतिभा मस्के (तळणी) १ लाख रुपये, बाबमिया हामिदमिया कुरेशी (लातूर) १ लाख रुपये, विठ्ठल पवार (हणमंतवाडी) १ लाख ५० हजार रुपये, उत्तमराव  गोडभरले (पाथरवाडी) १ लाख रुपये, दिलीप कंकाळ (लातूर) १ लाख रुपये, सतिष जाधव १ लाख रुपये, आदित्य पाटील (लोदगा) १ लाख रुपये, राजू धायतिडक (पाथरवाडी) १ लाख रुपये, कमरअली अहेमद सय्यद (अकलूज) ७५ हजार रुपये, अंबादास  जाधव (भिकारसांगवी) ७५ हजार रुपये, सचिन जाधव (भांगेवाडी) ७५ हजार रुपये, लक्षमीबाई  कदम (गुंजोटी) ७५ हजार रुपये, शकिलोद्दीन बदरुद्दीन शेख (परळी) ६० हजार रुपये ,देविदास वडजे (मसलगा) ६० हजार रुपये, चतुराबाई पवार (औसा) ६० हजार रुपये, तात्याराव कांबळे (लातूर) ५० हजार रुपये ,दैवशाला  काळे (लातूर) ५० हजार रुपये,अब्दुल मलिक हाफिज शेख (लातूर) ५० हजार रुपये, संजय कोटे (सारोळा) ५० हजार रुपये निधी मिळवून देण्यात आला आहे. लातुरसह इतरही जिल्ह्यातील नागरिकांना या माध्यमातून एकूण १७ लाख ३० हजार रुपयांची मदत मिळाली आहे.

इंदापूर खरेदी विक्री संघाच्या माजी अध्यक्षाचा कोयत्याने सपासप वार करुन खुन 

अभिमन्यु पवार यांच्या सुचनेवरून त्यांचे उद्धव तेलंगे यांनी संबंधित रुग्णांच्या फाईल तयार करणे तसेच पाठपुरावा करणे ही कामे केली. हा सहाय्यता निधी मिळाल्यामुळे गोरगरीब रुग्णांवर उपचार करणे शक्य होऊन त्यांना जगण्याची नवसंजीवनी मिळणार आहे.