COVID-19 : सर्वाधिक ‘कोरोना’चे प्रकरणअसणार्‍या ‘या’ 8 राज्यांमध्ये रूग्ण बरे होणार्‍या दर चांगला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या साथीचा रोग देशात झपाट्याने फैलावत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 10 हजाराहून अधिक प्रकरणांची नोंद झाली असून, सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3.6 लाखांवर पोहचली आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तर दुसरीकडे गृह मंत्री अमित शाह यांनी देशाची राजधानी दिल्ली येथे बैठक घेऊन कोरोना रुग्णांच्या वाढीचा आढावा घेतला. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असून महाराष्ट्रात एक तृतीयांश रुग्ण या आजाराने ग्रासले आहेत.
देशात या राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण
1. महाराष्ट्र
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. देशातील एक तृतियांश रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. गुरुवारी आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोविड 19 चे 1 लाख 16 हजार 752 प्रकरणे आहेत. राज्यात 5651 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 51935 इतकी असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 59166 इतकी आहे.

2. तामिळनाडू
महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूमध्ये कोविड 19 चे आतापर्य़ंत 50 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

3. दिल्ली
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा वेग कमी होता. मात्र, मागील 15 दिवसांमध्ये दिल्लीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा वेग वाढला आहे. दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47102 इतकी आहे.

4. गुजरात
कोविड 19 प्रकरणांची संख्या गुजरातमध्ये देखील सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत कोरोना बाधित 25093 रुग्ण आहेत.

5. उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात भारतातील सर्वाधिक लोकसंख्या आहे. या राज्यात कोविड -19 चे 15 हजाराच्या आसपास रुग्ण आहेत.

6. राजस्थान
राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असून कोरोनामुळे प्रभावीत झालेल्या राज्यामध्ये राजस्थान आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये 13542 रुग्ण आढळून आले आहेत. भारताच्या पश्चिमी राज्यांमध्ये 2762 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 10467 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

7. पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 12300 आहे. यामध्ये 5261 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून 6533 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

8. मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात कोरोना प्रकरणांची संख्या 11244 इतकी आहे. यापैकी 2374 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत तर 8388 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.