राज्यात शंभर मुन्नाभाई लुटत आहेत रुग्णांना 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 

संजय दत्त याचा मुन्नाभाई चित्रपट लोकांना अजून आठवत असेल. बोगस डॉक्टर बनून तो आपल्या वडिलांना फसवत असतो.असे किमान १०० मुन्नाभाई म्हणजेच बोगस डॉक्टर राज्यभरात रुग्णांची खुले आमपणे फसवणूक करुन लुटताहेत. विशेष म्हणजे त्यातील केवळ २० जणांवरच आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B00C0NU028′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’458f840f-8657-11e8-881c-7d8e9dec2fd7′]

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीच ही माहिती विधीमंडळात दिली. या डॉक्टरांनी आवश्यक असलेले शिक्षण घेतलेले नसून हे सगळे बोगस डॉक्टर्स महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या रडारवर आहेत. त्यातील ५३ डॉक्टरांच्या पदव्युत्तर पदव्या या प्रथमदर्शनी संशयास्पद आढळून आल्या आहेत. आतापर्यंत राज्यात २० बोगस डॉक्टर आणि ४ पॅथॉलॉजिस्टवर कारवाई केली असल्याचे महाजन यांनी सांगितले.

या बोगस डॉक्टरांनी  ग्रामीण भागात तसेच मोठ्या शहरांच्या उपनगरात आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्यावर एका ठिकाणी कारवाई झाल्यानंतर ते काही दिवसांनी जामीनावर सुटल्यावर दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपले दुकान थाटत असल्याचे दिसून आले आहे.