मुजफ्फरपुर शेल्टर होम रेप केस : ब्रजेश ठाकुरसह 19 जण दोषी, एक आरोपी निर्दोष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या साकेत कोर्टाने निकाल दिला आहे. यात मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर यांच्यासह १९ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे, तर एकाला निर्दोष सोडण्यात आले आहे. या प्रकरणी तीन वेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर अखेर आज कोर्टाने आपला निर्णय दिला. ब्रजेश ठाकूर यांना बलात्कार आणि बाल न्याय कायद्याच्या तरतुदींनुसार दोषी ठरविण्यात आले आहे. दरम्यान, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) च्या अहवालानुसार अनेक निवारा गृहांत मुलींवर लैंगिक छळ झाल्याचे समोर आले आहे.

हे संपूर्ण प्रकरण बिहारच्या निवारा गृहात अल्पवयीन मुली आणि तरूणींवरील बलात्काराशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयानं 7 फेब्रुवारी 2019 रोजी हे प्रकरण बिहारमधून दिल्ली येथे हस्तांतरित केले. यानंतर 23 फेब्रुवारीपासून साकेत कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सुमारे सात महिने सुनावणी घेतल्यानंतर 30 सप्टेंबर रोजी साकेत कोर्टाने याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला. 14 जानेवारी रोजी साकेत कोर्टाने सर्व आरोपींना जामीन नसल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलला. याशिवाय आरोपींच्या वकिलानेही मुलींचा दावा पटण्याजोगा नसल्याचा दावा करणारे निवेदन न्यायालयात सादर केले होते. कारण त्यांनी मुलींनाही निवारा गृहात ठार केल्याचे न्यायालयात सांगितले होते.

हा निर्णय तीन वेळा तहकूब करण्यात आला :
या प्रकरणात निर्णय विविध कारणांमुळे तीनदा पुढे ढकलण्यात आला. साकेत कोर्टाने ब्रजेश ठाकूर यांच्यासह २० आरोपींवर पोक्सो, बलात्कार, गुन्हेगारी कट रचनेसह इतर कलमांकरिता आरोप निश्चित केले होते. सीबीआयने या प्रकरणातील ब्रजेश ठाकूरला मुख्य आरोपी बनविले होते, सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, ज्या शेल्टर होममध्ये मुलींवर बलात्कार झाला आहे, ते ब्रजेश ठाकूर याचेच आहे. याशिवाय शेल्टर होमचे कर्मचारी आणि बिहार सरकारचे समाज कल्याण अधिकारीही या प्रकरणात आरोपी आहेत’.

फेसबुक पेज लाईक करा –