JDU मधून हाकालपट्टी केल्यावर प्रशांत किशोर नितीश कुमारांना म्हणाले ‘Thank You’

पटणा : वृत्तसंस्था – JDU चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. पक्षातून काढून टाकल्यानंतर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांचे आभार मानले आहेत. प्रशांत कुमार यांनी नितीश कुमार यांना ‘Thank You’ म्हटल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. जेडीयूने पक्षातून निलंबित केल्यानंतर प्रशांत कुमार यांनी ट्विट केले आहे.

मागील काही महिन्यांपासून प्रशांत किशोर यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांची ही वक्तव्य पक्षाच्या निर्णयाविरोधात असल्याचे त्यागी यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्या विरोधातही अपमानास्पद वक्तव्य केली होती असे पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के. सी. त्यागी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी केली होती बंडखोरी
प्रशांत किशोर यांना पक्षातून निलंबीत केल्यानंतर त्यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचे आभार मानले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशांत किशोर यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून पक्षाच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे बंडखोर म्हणून पाहीले जाऊ लागले.

नितीश कुमार नाराज
प्रशांत किशोर यांनी पक्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नितीश कुमार नाराज होते. ज्यांना पक्षात अडचणी आहेत ते पक्ष सोडून जाऊ शकतात. त्यावर प्रशांत किशोर यांनी ट्विट करून नितीश कुमार यांना फटकराले होते. तुम्ही मला जेडीयूत कसे घेऊन आला, याबद्दल आता खोट्या कहाण्या ऐकवत आहेत. तुम्हाला जर अमित शहांनी पाठवलेल्या माणसांचेच ऐकायचं असल्यास मी काय बोलणार असे प्रशांत किशोर म्हणाले होते.

फेसबुक पेज लाईक करा