देशातील सर्वात ‘व्यस्त’ विमानतळ बनलं पटणा एअरपोर्ट, दरवर्षी 45 लाख प्रवासी करताहेत प्रवास

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पटना विमानतळ देशातील तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे. रविवारी पटना विमानतळावरून 10 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी 7946 प्रवाशांनी आणि 22 ऑगस्ट रोजी 7165 प्रवाशांची वाहतूक पटना विमानतळावर झाली होती. विमानतळ संचालक भूपेश नेगी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 20 हजाराहून अधिक प्रवाशांसह कोलकाता देशात पहिल्या स्थानावर असून 12 हजार प्रवाशांसह चेन्नईचा दुसरा क्रमांक लागतो. सध्या विमानतळावरून विमानाच्या 29 जोड्या कार्यरत आहेत. पटना विमानतळावर दरवर्षी 45 लाख प्रवासी प्रवास करतात.

काेराेना काळात देशातील अनेक शहरांमध्ये आर्थिक कामे सुरू होत आहेत, कारखाने सुरू झाल्याने पटना विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण पटना येथून देशातील सर्व शहरांसाठी रेल्वेने अजून तरी गाड्या सोडलेल्या नाहीत, तर प्रत्येक मोठ्या औद्योगिक शहरांसाठी पटना विमानतळावरून थेट उड्डाणे आहेत.

सध्या पटना ते लखनऊ, वाराणसी, अमृतसर आणि गुवाहाटी अशी थेट उड्डाणे आहेत आणि यामुळेच पटना विमानतळावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. पटना विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असताना, उड्डाणे आणि सुविधाही निरंतर वाढत आहेत. पटना विमानतळावर दरवर्षी 45 लाख प्रवासी प्रवास करतात. सुविधांचा विस्तार झाल्यानंतर याची वार्षिक क्षमता 8 दशलक्ष प्रवाशांची असेल. पटना विमानतळाला लवकरच देशाच्या नव्या विमानतळासारख्या सुविधांमध्ये आणि नवीन रूपात आकार देण्यात येईल. पटना विमानतळ दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू विमानतळ सारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या तयारीत आहे.

यासाठी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत स्वयंचलित पायऱ्या, लिफ्ट आणि पाच एरोब्रिज बनविण्यात येणार आहेत. विमानतळावर तयार करण्यात येणाऱ्या एरोब्रीजमध्ये बिहारच्या लोककला दिसतील तसेच टर्मिनल इमारतीतही ठिकठिकाणी मधुबनी पेंटिंग आणि टिकुली कलेची झलक पाहायला मिळणार आहे. विमानतळ नालंदाच्या अवशेषांसारखे दिसेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like