पटना विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पटना विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे बिहार पोलिसांची एकच खळबळ उडाली. बॉम्बने विमानतळ उडवण्याची धमकी मिळाल्यावर पटना विमानतळाची सुरक्षा वढवण्यात आली आहे. विमानतळाचे प्रभारी निर्देशक एस विजयन यांनी सांगितले की रविवारी रात्री 9.30 वाजता एक फोन कोलकत्याहून आला होता, ज्यात पटना विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाला पटना विमानतळाने प्रार्थमिक दर्जावर नोंद करुन घेतली आहे.

धमकीचा फोन आल्यानंतर विमानतळ प्रशासनाने त्यांची दखल घेऊन लगेचच विमानतळाची तपासणी केली. यावर एस विजयन यांनी सांगितले की, रात्री 9.30 वाजता कोलकत्यावरुन धमकीचा फोन आल्यानंतर रात्री 12.15 वाजता विमानतळ परिसराची तपासणी करण्यात आली. यात काहीही मिळले नाही. सर्व काही ठीक असल्याचे यातून निष्पण झाले. त्यांनी असे देखील सांगितले की, विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आणि सगळं काही ठीक आहे.

पोलिस उपाधिक्षक, सचिवालय आर. के भास्कर यांनी सांगितले की रात्री विमानतळाची तपासणी करताना कोणताही बॉम्ब सापडलेला नाही किंवा त्यासारखे अन्य काहीही हाती लागले नाही. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, कोलकत्यावरुन जो धमकी देणारा फोन आला होता त्याचा तपास करण्यात येत आहे.
पटना विमानतळ बॉम्बने उडवून देणारा फोन आल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली होती.

आरोग्य विषयक वृत्त – 

शाळांमध्ये लागणार तंबाखूविरोधी फलक

महाराष्ट्रात ‘निपाह’चा धोका नाही ; मात्र खबरदारी घ्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे