बिहार विधानसभा : BJP, JDU, LJP मिळून लढणार निवडणूक, भूपेंद्र यादव यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये सीट शेयरिंगबाबत भारतीय जनता पार्टी (BJP) च्या बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर बिहार भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव (Bhoopendra Yadav) यांनी म्हटले की, भाजपाचे बिहार राज्याचे प्रमुख नेते, जेपी नड्डा, अमित शाह आणि बी एल संतोष (JP Nadda, Amit Shah and BL Santosh) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत या गोष्टीवर सहमती झाली की, राज्यात भाजपा, जेडीयू, एलजेपी मिळून निवडणूक लढवतील. यासोबतच जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांची पार्टी हिंदुस्तानी आवाम मोर्चा सुद्धा सोबत असेल.

भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणूक प्रभारी बनवण्याची अधिकृत घोषणा सुद्धा केली. त्यांनी दावा केला की, राज्यात पुन्हा एकदा एनडीएचाच विजय होईल आणि नीतीश कुमारच मुख्यमंत्री बनतील. बिहारची जनता आमच्या सोबत आहे आणि येणारे दोन-तीन दिवस आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. लवकरच आघाडीकडून जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल.

भाजपाच्या या बैठकीनंतर आमित शाह यांच्यासोबत लोजपा अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांची सुद्धा बैठक होणार असल्याचे वृत्त आहे, ज्यानंतर जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा प्रथम चिराग पासवान यांना पटवण्याचा प्रयत्न करेल. जर सर्व ठिक झाले तर बुधवारी रात्री किंवा गुरूवारी जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल.

जेडीयूच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. माहितीनुसार, जेडीयूकडून तिकिटासाठी चर्चा करत असलेले खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह दिल्लीत भाजपा आणि जेडीयूच्या नेत्यांसोबत फायनल चर्चा करतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like