‘या’ अभिनेत्रीनं ‘ढसाढसा’ रडत PM नरेंद्र मोदींकडे मागितली मदत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपूरी अभिनेत्री नेहा बन्सल हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेहाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचाना करताना दिसत आहे. तसेच ती ढसाढसा रडतानाही दिसत आहे. नेहाने या व्हिडीओमध्ये आपल्या पतीवर आरोप केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला मदत करावी अशी मागणी तिने केली आहे. नेहाचा पती अमेरिकन नागरिक असून लग्नानंतर त्याने मारहाण करून सोडून दिल्याचा आरोप पतीवर केला आहे.

Beti bachao ki baat karne wali Indian government please help meIndian police please help meKya Hindustan May paida hona itni badi galti hai meri ki mujhe insaf nahi milega koi bhi meri zindgi ke sath khel kar bhag jayega. Kya Hindu samaan itna darta hai America se Kya Hindustan ke bhai behan meri help karenge

Geplaatst door Neha Vijay Thakkar op Zaterdag 12 oktober 2019

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेहा सांगते, मला आई-वडील नाहीत त्यामुळे लग्न आणि पतीचा कुटुंबच माझ्यासाठी सर्वकाही होतं. मात्र, माझा पती लग्नानंतर 6 महिन्यांनी मला स्वत:बरोबर घेऊन जाण्यास नकार देत आहे. तो एक अमेरिकन नागरिक असून मागील सहा महिन्यात त्याने अनेक वेगवेगळी आश्वासन देऊन माझी फसवणूक केली आणि आता मला पीएम मोदी आणि त्यांच्या कायद्याची भीती वाटत नाही, असे सांगत त्याने माला सोबत न्यायला नकार दिला आहे.

व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये नेहा सांगतेय की, मी तीन दिवसांपासून काहीही न खाता पोलीस ठाण्यात जात आहे. मोदीजी कृपया माझी मदत करा. माझा पती अमेरिकन नागरिक आहे. सहा महिन्यापूर्वी आम्ही लग्न केलं. माझे आई-वडील नाही. मी मझं सर्वकाही विकून लग्न केलं. पण माझा पती माझी जबाबदारी घेण्यास आता नकार दिला आहे आणि आज माझ्या घरी तोड-फोड करुन निघून गेला.

नेहा पुढे म्हणते, माझ्या पतीची आई, बहिण आणि तिचा पती मला आणि माझ्या पतीला भेटू देत नाहीत. आता तो अमेरिकेला निघून जाण्याचा विचारात आहे. जर त्याने असे केले तर मला आत्महत्या करण्यापलिकडे कोणताच पर्याय नाही. चार दिवसांनी माझा पहिला करवाचौथ आहे. मोदीजी मी तुम्हाला विनंती करते की त्यांनी माझ्या पतील पळून जाण्यापासून थाबवा.
Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like