BJP ला जास्त जागा मिळाल्यावर NDA मध्ये बदलू शकते सत्तेचे समीकरण, वाचा इनसाईड स्टोरी

इस्लामपुर/पटना : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या समोर राज्यात सत्ता कायम राखणे आणि सत्तारूढ आघाडी अंतर्गत आपल्या पक्षाला प्राधान्य कायम राखण्याचे दुहेरी आव्हान आहे. या सर्वाच्या दरम्यान त्यांचा मुळ जिल्हा नालंदासह काही ठिकाणी एक बेचैनीची भावना दिसत आहे. मुख्यमंत्री कुमार यांच्या निवडणूक प्रचार रॅलीत येणार्‍या गर्दीला थांबवण्याचा प्रयत्न करणारे वक्ते पार्टीचे पारंपारिक समर्थक दलित आणि अत्यंत मागास वर्गाच्या लोकांना नीतीश यांच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन करताना दिसून आले. या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या बोलण्याने विचलित होऊ नका, असे आवाहनदेखील करत आहेत.

जदयूच्या वक्त्यांचा हा आग्रह सांगतो की, पार्टीचा प्रयत्न आहे की, त्यांना पारंपारिक मतदारांच्या आधाराला नीतीश यांच्या आजू-बाजूला एकवटून ठेवायचे आहे. अत्यंत मागास वर्ग (ईबीसी) मध्ये अनेक छोट्या जातीसुद्धा सहभागी आहेत आणि राज्याच्या लोकसंख्येत जवळपास 28-30 टक्के भाग यांचाच आहे. नीतीश सरकारने मागच्या वर्षी सुद्धा विविध उपक्रमांद्वारे त्यांना आपल्याकडे आकर्षित केले होते. मात्र, काही अन्य जातींप्रमाणे ईबीसी राजकीयदृष्ट्या सक्रिय नाही. या वर्गाने पारंपारिकदृष्ट्या जदयूला समर्थन दिले आहे. असेच ‘महादलितां’च्या सोबत आहे. ज्यांची संख्या राज्यात दलितांमध्ये जवळपास एक तृतियांश आहे. ‘महादलित’चा वापर पासवान यांच्याशिवाय अन्य अनुसूचित जातींसाठी केला जातो.

निवडणुकीत मंद पडली जादुई शक्ती
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जदयूला ज्या अगडी जातींचे समर्थन होते, त्यामध्ये घट झाली आहे. मात्र, उच्च जाती नीतीश यांचा सहकारी पक्ष भाजपाच्या पाठीमागे मजबूतीने उभ्या आहेत. जदयूसाठी राज्यात अनेक जागांवर अवघड स्थिती झाली आहे, कारण चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टीने नीतीश कुमारांच्या पार्टीच्या उमेदवारांच्या विरूद्ध आपले उमेदवार उभे केले आहेत. नीतीश यांच्या विरोधकांनी म्हटले आहे की, भाजपा किंवा राजद प्रमाणे संघटनात्मक स्तरावर इतके मजूबत नसल्याने जदयूने नीतीश कुमार यांच्या ‘सुशासन बाबू’च्या प्रतिमेवर जोर दिला आहे, परंतु सतत 15 वर्षांपासून सत्तेत कायम असल्याने यावेळी निवडणुकीत त्यांची जादुई शक्ती मंद झाली आहे.

परंतु आता बदलाची हवा आहे
रंजन राम यांनी म्हटले, नीतीशजी यांनी कामे केली आहेत, परंतु आता बदलाची हवा आहे. विद्यार्थी आकाश कुमारने म्हटले, नीतीश यांनी रस्ते बनवले आणि आम्हाला वीज दिली. परंतु आम्हाला रोजगाराची सुद्धा आवश्यकता आहे. बिहारमध्ये कोणताही नवा उद्योग आला नाही. उच्च शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट आहे. माझी प्रथम वर्षाची परीक्षा दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला अजून आयोजित केलेली नाही.

आकाशचा मित्र अमरेंद्र सिंहने म्हटले की, सुशासनबाबत बोलणे योग्य ठरेल का, जेव्हा 2019 मध्ये राज्याची राजधानी पटणामध्ये सुद्धा इतका पूर आला. फेरीवाले रंजन पासवान म्हणाले, जो दारू विकतो, तो मालामाल होतो, तर जो दारू पितो, तो कंगाल आहे. त्यांनी म्हटले, श्रीमंत लोक आपल्या घरात आरामात पितात. एखादा गरिब प्यायला तर त्यास पोलीस पकडतात, त्रास देतात. बिहारमध्ये पूर्ण दारूबंदी आहे आणि दारूबंदीमुळे घरगुती हिंसेतून दिलासा मिळाल्याने जदयूला महिला मतदारांकडून आशा आहे. निवडणुकीचा निकाल नीतीश कुमार यांच्या सरकारचे भाग्य आणि त्यांच्या पक्षाचे स्थान कोणते असेल, याचाही निर्णय ठरवणार आहे.

भाजपाचे 110 जागांवर उमेदवार
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत जदयूने भाजपापेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत, परंतु असा अंदाज लावला जात आहे की, यावेळी निवडणुकीत हे बदलू शकते. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी जदयूने 115 जागा आणि भाजपाने 110 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर उर्वरित 18 जागांवर राजगमधील दोन अन्य छोट्या घटक पक्षांनी आपसातील ताळमेळासह उमेदवार उभे केले आहेत. भाजपाने म्हटले आहे की, जरी भाजपाच्या जास्त जागा आल्या तरी नीतीशच मुख्यमंत्री होतील. मात्र, भाजपाने खुपच जास्त जागा मिळवण्याच्य स्थितीत आघाडी अंतर्गत सत्ता समिकरण बदलू शकते.

You might also like