बिहारच्या बोर्डानं केला नवा ‘कारनामा’ ! विद्यार्थी ऋषिकेशला बनवलं चक्क दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री अनुपमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या कारनाम्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या बिहार विद्यालय परीक्षा समितीचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वास्तविक, यावेळी दक्षिण भारतीय सिने अभिनेत्रीचा फोटो एसटीईटी उमेदवाराच्या अ‍ॅडमिट कार्डवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, जहानाबाद जिल्ह्यातील मखदूमपूर पोलिस स्टेशन परिसरातील भगवानपूर गावात राहणाऱ्या ऋषिकेश कुमारने एसटीईटीसाठी नोंदणी केली होती. नोंदणी स्लिपवर उमेदवाराचा फोटो लावण्यात आला आहे, परंतु मंडळाने जारी केलेल्या प्रवेशापत्रात दक्षिण भारतीय सिने अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांचा फोटो लावण्यात आला आहे. अ‍ॅडमिट कार्डवर त्याचे छायाचित्र नसल्याने उमेदवार हैराण झाला आणि याप्रकरणी तो सोमवारी बोर्ड कार्यालयात पोहोचला. याची माहिती मिळताच बिहार बोर्डाच्या कर्मचार्‍यांनी त्याचे प्रवेश पत्र सादर केले. तसेच कारवाईचे आश्वासन देऊन पुन्हा प्रवेशपत्र देण्याचे सांगितले जाते.

कोण आहे अनुपमा परमेश्वरन :
अनुपमा परमेश्वरन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. जिने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांचा समावेश आहे. तिचा पहिला चित्रपट प्रेमम वर्ष २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे तिने ओळख निर्माण केली होती. प्रेमम (२०१५) चित्रपट मल्याळम भाषेतील चित्रपटात होता, जो व्यवसाय करण्यात यशस्वी झाला. यानंतर तिला जेम्स एंड एलिस (२०१६) या आणखी एका मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पृथ्वीराज सुकुमारन हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like