बिहार निवडणुकीपूर्वी ‘कोरोना’च्या विळख्यात NDA चे नेते, फडणवीस आणि सुशील मोदी यांच्यासह आत्तापर्यंत 7 जण पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बिहार विधानसभा निवडणूक 2020 चे भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेशन मध्ये ठेवले आहे. फडणवीस यांनी ट्वीट केले की, ‘लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे, पण आता थोड्या वेळासाठी थांबून थोडा वेळ घ्यावा अशी देवाची इच्छा आहे! मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहेत. यासह त्यांनी लिहिले की, ‘जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.’

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन, माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी, मंगल पांडे आणि जेडीयूचे विजय कुमार मांझी यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आकडेवारी पाहिल्यास एनडीएच्या 7 नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

फडणवीस यांच्या काही दिवस आधी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सारणचे खासदार राजीव प्रताप आणि भाजपचे स्टार प्रचारक शहनवाज हुसेन हेही कोरोना संक्रमित असल्याचे आढळले आहे. शाहनवाज हुसेन यांनी बुधवारी ट्वीट करुन आपल्या संसर्गाची माहिती दिली आणि म्हटले आहे की जे त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोविड -19 ची चाचणी करून घ्यावी.

यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या आदल्या दिवशी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी त्यांना संसर्ग झाल्याची माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सुशील मोदी यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सुशील मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘तपासणीत परिस्थिती सामान्य असल्याचे दिसून आले आहे आणि मी लवकरच प्रचारासाठी मैदानात परत येईन.’

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात बिहारमधील राजकीय पक्षांना कोविड -19 च्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन निवडणूक प्रचारादरम्यान सामाजिक अंतर राखण्यास सांगितले. तज्ज्ञांनी सांगितले की मास्क घालण्याची मार्गदर्शक तत्त्वे असूनही, सामाजिक अंतर आणि थर्मल स्क्रिनिंग असूनही, रॅलींमध्ये प्रोटोकॉल उल्लंघनाची अनेक उदाहरणे पाहिली. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 10 नोव्हेंबर रोजी होईल.

You might also like