‘या’ राज्यात आई-वडिलांचा संभाळ न करणाऱ्यांना जावे लागणार तुरुंगात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. नितीश सरकारने घेतलेल्या दारूबंदी आणि हुंडाबंदी या निर्णयानंतर आता नीतीश सरकारने समाज सुधारणा कामवर भर देण्यास सुरूवात केली आहे. या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयात आई वडीलांची सेवा न करणाऱ्यांना आता तुरुंगात जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आता मुलांना आई वडीलांची सेवा करणे अनिवार्य झाले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री वृद्धा पेंशन योजना याची आता राईट टू सर्विस अॅक्टच्या अंतर्गत सामील करण्यात आले आहे.

दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवानांना देणार सरकारी नोकरी –
एवढेच नाही तर काश्मीरच्या पुलवाला आणि कुपवाड मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या बिहारमधील जवानांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय नितीश कुमार सरकारने घेतला आहे. पुलवामा हल्यात भागलपूरचे जवान रतन कुमार आणि मसौढीचे जवान संजय सिन्हा यांना तर कुपवाडा हल्यातील शहीद बेगूसरायच्या पिंटू कुमार सिंह हे शहीद झाले होते.

तसेच आवास भत्त्यात वृद्धि करण्याबरोबर बिहार नगर आणि गुंतवणूक सेवा नियमावली 2019 च्या स्वीकृती प्रदान करण्यात येणार आहे. वित्त वर्ष 2019-20 च्या कर्जा फेडण्याची योजना देखील योजना तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत तब्बल 25 हजार 750. 93 कोटी रुपये परत फेड करण्यात येणार आहे.

भागलपूरच्या गंगा नदी पर विक्रमशिला सेतूला समांतर असलेल्या पुलाचा निर्माण करण्यात येणार आहे त्यात 4 लेन असणार आहे. तसेच सुपौलच्या हायड्रोपाॅवर च्या एक्सटेंशन करुन त्यात 130 मेगावॅट वीज उत्पादन करण्यात येणार आहे. डागमरा जल विद्युत परियोजनाचे एक्सटेंशन करण्यात येणार आहे, त्यात एकून 11.68 कोटीची स्विकृती प्रदान करण्यात येईल.

आरोग्य विषयक वृत्त –

दररोज अंडी खाताय मग हे नक्की वाचा !

चिंचेमध्ये लपले आहे तारुण्यपणाचे रहस्य, असा वापर करा

‘हे’ आहेत AC मध्ये बसण्याचे ‘वाईट’ परिणाम ; मेंदूवरही पडतो ‘असा’ प्रभाव

आता डॉक्टरांसाठीही सुरु होणार ‘काउंसिलिंग सेंटर’

You might also like