‘कॅप्टन कूल’ महेंद्र सिंह धोनीची निवृत्तीनंतर भाजपसाठी ‘बॅटिंग’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून तो भाजपच्या सदस्यपदाची शपथ घेणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी दिली आहे. बिहार विधानपरिषदेचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. यासाठी अनेक वेळा धोनीशी चर्चा झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

धोनीची घेतली आहे भेट

भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क अभियानावेळी पक्षाच्या अनेक नेत्यांनी धोनीची भेट घेतली होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील या अभियानावेळी त्याची भेट घेतली होती. पासवान यांनी आणखी पुढे बोलताना म्हटले कि, समाजासाठी तो आदर्श आहे. क्रीडा जगत असो किंवा सिनेमा जगत किंवा शिक्षा या सगळ्या विभागातील लोकांना बरोबर घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. धोनी आमच्याबरोबर आला तर आणखीनच उत्तम होईल. कुठल्याही नेत्यांपेक्षा तो जनतेला मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकतो.

धोनीचे चाहते आनंदित

भाजपच्या अनेक नेत्यांबरोबरच यामुळे धोनीच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. धोनीच्या चाहत्यांना देखील त्याने भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटत आहे. मात्र धोनी भविष्यात काय निर्णय घेणार हे त्यालाच माहित असले तर राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात यामुळे आनंद व्यक्त होताना दिसत आहे. त्याचबरोबर राजकारणात सध्या हा खूप मोठा चर्चेचा विषय झाला आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय