बिहारमधील ‘या’ बड्या नेत्याचा लग्‍नानंतर काही दिवसातच ‘घटस्फोट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. बिहारमधील माजी मंत्री आणि नेते चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्याशी मागील वर्षी त्यांचा विवाह झाला होता. मात्र काही दिवस सर्व सुरळीत चालल्यानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. त्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. अखेर त्यांचा घटस्फोट झाला असून आता ऐश्वर्या राय हि देखील तेजप्रताप यादव यांच्याविरोधात बोलणार आहे. हे प्रकरण सुरु असताना तिने एक शब्ददेखील काढला नव्हता.

‘या’ पक्षात प्रवेश करणार चंद्रिका राय
त्यानंतर आता माजी मंत्री आणि नेते चंद्रिका राय हे देखील राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडणार असून ते भाजप किंवा संयुक्त जनता दलात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ते कधी पक्षातून बाहेर पडणार याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पक्षातून बाहेर पडल्यानंतर ते आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या उघडपणे लालू प्रसाद यादव आणि तेजप्रताप यादव यांच्याविरोधात आघाडी उघडणार आहेत.

तेजप्रताप यांना हवा होता घटस्फोट
मागील वर्षी ऐश्वर्या यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली, त्यानंतर तेजप्रताप यांनी यासंबंधी उघडपणे नाराजी व्यक्त करत आपण घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, या सगळ्यात तुरुंगात असलेले लालूप्रसाद यादव यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे वाहतूक शाखेतील ‘ढेरपोटे’ पोलिसांना ड्यूटी नाही ; उपायुक्तांचा आदेश

पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’

क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला

You might also like