मुलानं 30 रुपयाची ‘पाणीपुरी’ काय खाल्ली बाप ‘जल्लाद’चं बनला, दोन्ही पाय बांधून ‘जिवंत’ जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोरानं 30 रुपयांची पाणीपुरी, समोसे आणि कुरकूरे खाल्ले म्हणून बापाने पोराला बांधून जिवंत पेटवून दिले. या हैवान बापानं पोराला पहिल्यांदा देखील लोखंड गरम करुन चटके दिले होते. रागाच्या भरात पोराचा जीवंत जाळल्याची ही घटना बिहारमधील औरंगाबादाच्या मदनपूर पोलीस स्टेशनच्या इस्लामपूर गावात घडली. गंभीर भासलेला मुलाची तब्येत नाजूक असल्याचे सांगण्यात आले.

मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. यात जखमी शमशादने सांगितले की घरात 50 रुपये ठेवले होते, त्यातील 30 रुपये घेऊन पाणीपुरी आणि सामोसे, कुरुकुरे खाल्ले. बाकी 20 रुपये त्यांने आपल्या लहान भाऊ इबरामला दिले. यामुळे वडील शहाबुद्दीन यांनी मुलाच्या दोन्ही पायावर कपडा बांधून तेल शिंपडून आग लावली. वडिलांच्या राग पाहून मुलाची आई देखील त्यापासून लांब राहिली. मुलाने सांगितले की 15 दिवसांपूर्वी वडीलांनी त्यांच्या हातावर गरम लोखंडाने चटके दिले होते.

रुग्णालयात उपचारा दरम्यान शमशाद भीतीत होता. तो फक्त रडत होता. मदनपूरचे प्रभारी चिकित्सा पदाधिकारी डॉ. सत्यनारायण प्रसाद यांनी सांगितले की शमशादला प्राथमिक उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like