5 युवतींसह ‘आक्षेपार्ह’ स्थितीत आढळून आले 3 युवक, पोलिस अधिकार्‍यांनी देखील ‘माना’ खाली घातल्या ‘लाज’ वाटल्यानं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – बिहारच्या औरंगाबादमध्ये अनैतिक धंद्याचा प्रकार उघड झाला आहे. येथील जीटी रोड ओव्हरब्रिज जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहचलेल्या पोलिसांना जे आढळले ते शरमेने मान खाली जाणारे होते. औरंगाबादचे एसडीपीओ अनूप कुमार यांनी शहर पोलीसांच्या पथकासह छापेमारी करून घटनास्थळावरून पाच तरूणी आणि एका युवकाला ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या तरूणींपैकी एक विद्यार्थीनी बिहार बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर एका तरूणासोबत हॉटेलमध्ये आली होती. छापेमारीचा सुगावा लागताच घटनास्थळावर असलेले दोन तरूण संधी साधून फरार झाले. हॉटेलचा व्यवस्थापकसुद्धा फरार झाला.

याप्रकरणात पोलीस निरिक्षक रविभूषण यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हॉटेल व्यवस्थापकासह अन्य तिघांना आरोपी करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन तरूणी आणि एका तरूणीची रवानगी पोलिसांनी कारागृहात केली आहे. तर, पकडण्यात आलेल्या एका विद्यार्थीनीच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

खबर मिळताच पोलिसांनी मारला हॉटेलवर छापा

औरंगाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीटी रोडजवळील हॉटलमध्ये काही तरूण-तरूणी एकत्र जमल्याची खबर पोलिसांना मिळाली. प्रकरण गंभीर असल्याने एसडीपीओ अनूप कुमार यांच्या नेतृत्वाखाली छापा मारण्याची योजना तयार करण्यात आली. नंतर पोलीस हॉटेलवर धडकले.

खोल्यांमध्ये आक्षेपार्ह स्थितीत सापडल्या तीन जोड्या

पोलीस हॉटेलात पोहचताच सर्वांची पळापळ सुरू झाली. हॉटेलच्या तीन खोल्यांमध्ये तीन जोड्या होत्या, ज्या आक्षपार्ह स्थितीत मिळून आल्या. यावेळी एका युवकाला अटक करण्यात आली. तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी हॉटेलमधून पाच तरूणींनाही पकडले.

पकडण्यात आलेल्या विद्यार्थीनीला सोपवले पालकांकडे

पकडण्यात आलेल्या तरूणींमध्ये एक विद्यार्थीनी होती, जी औरंगाबादमध्ये परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा दिल्यानंतर ती युवकासोबत हॉटेलमध्ये आली होती. पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले.

शहरात देहविक्री जोरात

काही महिन्यांपूर्वी सुद्धा शहर पोलिसांनी भाजी मार्केटजवळील एका हॉटेलमध्ये छापा मारून देह व्यापार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. शहरातील हॉटेलांसह जीटी रोडवरील हॉटेलांमध्ये सुद्धा देहविक्रिचा धंदा तेजीत आहे. यामध्ये शहरातील मुली तसेच ग्रामीण भागातील तरूणी सहभागी आहेत.