सासूनं जावायाला दिला भयानक मृत्यू, म्हणाली – ‘तो त्याच्या सवयीच्या आहरी गेला होता, मारून टाकलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका आईला आपल्या मुलीचे दुःख पहावत नव्हते, आपल्या जावयाच्या कारनाम्यांमुळे सासू देखील त्रस्त झाली होती अखेर तिने वैतागून जावयाला घरी बोलावले आणि दगडाने ठेचून ठेचून मारले. यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला सकाळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना तो मिळाला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद शाहनवाज आलम, जमुई जिल्ह्यातील महाराजगंज येथील रहिवासी असल्याचे समजले आणि त्याचे लग्न आठ वर्षांपूर्वी भागलपूर येथील इशाकचक, बरहापुरा येथे राहणाऱ्या सना जमशेदशी झाले होते. शाहनवाज हा आपली सासू आणि पत्नीसमवेत मुंगेर येथे राहत होता.

दोन दिवसांपूर्वी शहनवाजची पत्नी भागलपूर येथे गेली होती आणि सासू मुंगेरमध्ये होती. गुरुवारी रात्री झोपलेल्या शहनवाजच्या सासूने त्याची हत्या केली. मग मृतदेह रस्त्यावर फेकला. त्यानंतर घरातले रक्त साफ केले आणि हत्येसाठी वापरलेला दगड देखील फेकून दिला, जो नंतर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी सांगितले की, शबनमच्या घरच्यांनी अज्ञातांबाबत हत्येची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांना संशय आला तेव्हा त्यांनी सासू आणि पत्नीची चौकशी केली तेव्हा प्रकरण उघडकीस आले. सासूने सांगितले की, जावयाचे अनेक महिलांशी संबंध होते. ज्यामुळे त्यांची मुलगी अनेक दिवसांपासून त्रस्त होती. यामुळे वैतागून जावयाची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी सासूला अटक केली आहे.

पोलिसांच्या चौकशीमध्ये शबनमने सांगितले की, चार दिवसांपूर्वीच एका जमिनीच्या रजिस्ट्रीसाठी सर्व जण गेले होते. शहनवाज सोबतच सासू परत मुंगेर येथे आली होती. मुलीच्या अनुपस्थितीमध्ये झोपलेल्या जावयाची तिने दगडाने ठेचून हत्या केली.

मुंगेरचे एसपी लिपी सिंह यांनी सांगितले की, मृतदेहाची ओळख पडल्यानंतर घरच्यांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता. सासूवर संशय होता, यामध्ये श्वानपथक,एफएसएल आणि मोबाइल सीडीआरची मदत मिळाली तेव्हा सासूवर कठोर सक्ती केली तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like