Muzaffarpur Shelter Home Case : दोषी ब्रजेश ठाकुरला जन्मठेप, शिक्षा ऐकून रडू लागला नराधम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुजफ्फरपुर येथील बालिका गृहकांडाबाबत दिल्ली न्यायालयाने मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूरला जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. आता त्याचे संपूर्ण आयुष्य जेलमध्ये जाणार आहे. शिक्षेची घोषणा होताच ठाकूर रडू लागला. इतर 19 दोषींना देखील यामध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिल्लीतील साकेत कोर्टाने चार फेब्रुवारी रोजी शिक्षेबाबतची सुनावणी पूर्ण केली होती आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्याची तारीख 11 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली आणि तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आणि दोषींनी जास्तीत जास्त शिक्षेची विनंती केली होती.

नाबालिक मुलींचे होत होते यौन शोषण
TISS कडून याबाबत एक अहवाल देण्यात आला आहे.या प्रकरणात 40 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. अल्पवयीन मुलींनी त्यांना अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे त्यांच्या अंगावर काटा येईल. या अहवालानंतर एकाच खळबळ उडाली आहे.

अहवालानुसार ब्रजेश ठाकुर यांच्या सेवा संकल्प संस्थेमध्ये बालिका गृहामध्ये नाबालिक मुलींवर बलात्कार सोबत इतर भयानक वाईट गोष्टी देखील केल्या जात होत्या. या खुलास्यानंतर 31 मे 2018 रोजी महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत मोठा गोंधळ निर्माण होऊन लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सर्वत्र हा विषय गाजला होता.

ब्रजेश ठाकुर याचे संबंध सर्व सरकारी खात्यामध्ये होते आणि अशा संपर्काच्या जोरावर तो हे असे प्रकार चालवत होता. एनजीओ सोबतच तो अनेक वृत्तपत्रांचे प्रकाशन देखील करत होता. विशेष म्हणजे टीसच्या अहवालानंतर त्याच्या एनजीओला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते तरी देखील भिखाऱ्याच्या निवासासाठी महिन्याला एक लाखांचे प्रोजेक्ट त्याला देण्यात आले होते. मात्र नंतर या प्रोजेक्टला रद्द करण्यात आले होते.