लालू म्हणाले होते – ‘पलटूराम’, तेजप्रतापनं तर मुख्यमंत्री नीतीश कुमारांचं चक्क बदललं ‘Gender’ (व्हिडीओ)

पटणा : वृत्तसंस्था –  महाआघाडीशी नाते तोडून एनडीएचा हात पकडल्यानंतर मुख्यमंत्री नितिश कुमार राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी पलटूराम म्हटले होते. आता त्यांचा मोठा मुलगा तेजप्रतापने नितिश कुमार यांचे नवे नामकरणच केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते नितिश कुमार नाहीत, नितिश कुमारी आहेत. यावेळी तेजप्रताप यांनी सएए, एनआरसीवरून सुद्धा जोरदार हल्ला चढवला.

तेजप्रताप यांनी बदलले जेंडर, केले वादग्रस्त वक्तव्य

तेज प्रताप यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार आणि सुशील मोदी यांच्या विरूद्ध वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांना नितिश कुमारी आणि सुशील कुमारी म्हटले. यासोबतच तेज प्रताप यांनी भाजपा आणि जदयू नेत्यांना समोर येऊन राजकीय लढाई लढण्याचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, जर हिम्मत असेल तर मैदानात येऊन लढा, घरात बांगड्या घालून बोलू नका.

महुआ विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी सीएम नितिश कुमार यांच्याबाबत म्हटले की त्यांनी माझ्या वडीलांना धोका दिला. अगोदर म्हटले की, आपण म्हातारे झालो आहोत आणि आता सत्ता मुलांनी सांभाळली पाहिजे. परंतु, जेव्हा त्यांनी पाहिले की लालूंची दोन्ही मुले पुढे जात आहेत, तेव्हा त्यांनीच हात मागे ओढला आणि दुसर्‍या लोकांसोबत कट रचून खोट्या खटल्यांमध्ये लालूंना फसवून जेलमध्ये पाठवले आहे.

माझे वडील जेलच्या बाहेर असते तर गर्दन उडवली असती

तेजप्रतात यांनी म्हटले की, जर आज लालू यादव जेलच्या बाहेर असते तर कुणाची हिंमत नव्हती की देशात लोकशाही आणि संविधानविरोधी एनआरसी आणि एनपीआर लागू करण्याची. येथे लोक विरोध करत आहेत आणि संसदेत जाऊन येथील लोक त्यांच्या निर्णयांना पाठींबा देत आहेत. लालू बाहेर असते तर यांची गर्दन उडवली असती.

जनता यावेळेस त्यांना धडा शिकवतील

तेजप्रताप यादव यांनी बुधवारी मसौडीच्या मलकाना मोहल्लामध्ये संविधान बचाओ मोर्चाद्वारे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनात संबोधित करताना म्हटले की, केंद्रातील सरकार जाती आणि धर्माचे राजकारण करत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि बिहारच्या नितिश सरकारचा चेहरा उघडा पडला आहे. आगामी निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील.

तेजप्रताप यादव यांनी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय यांच्यावरही हल्ला केला. ते म्हटले की, बिहारमध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. रोज खून, बलात्कार, अपहरणासारख्या घटना घडत आहेत आणि सरकार गप्प आहे.