जेव्हा भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहने राखी सावंतला KISS करण्याचा प्रयत्न केला (व्हिडीओ)

पटना : वृ्त्तसंस्था – नेहमीच वादग्रस्त ठरणारी राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत राखी सोबत भोजपुरी सुपरस्टार पवनसिंह विचित्र पण जरा विनोदी हरकत करताना दिसत आहे. याशिवाय राखीही पवन सिंहला अडवताना दिसत आहे.

हा व्हिडीओ भोजपुरी सिनेमा सबसे बडा चँपियन या सिनेमातील शुटींगदरम्यानचा आहे. या सिनेमात राखीने आयटम नंबर केला होता. लगा नवरतन तेल गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. परंतु सध्या सोशलवर पसरताना दिसत आहे. राखीने 2018 साली हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

व्हिडीओत दिसत आहे की, डान्स करताना अचानक पवन सिंह राखीच्या जवळ येत आहे आणि राखीला किस करण्याचा प्रयत्न करत आहे. राखीने लगेचच पवन सिंहला अडवलं आणि गाणं मध्येच बंद झालं. राखीने हे गमतीने घेतलं. परंतु पवन सिंहच्या कारनाम्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

राखीचे ठुमके भोजपुरी इंडस्ट्रीतही खूप फेमस आहेत. राखीने पवन सिंह सोबतच भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि रवी किशन या कलाकारांसोबतही काम केलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –